घरमहाराष्ट्र'मी कंटाळलो, मला माफ करा'; नागपूरात चिठ्ठी लिहून शिक्षकाची आत्महत्या

‘मी कंटाळलो, मला माफ करा’; नागपूरात चिठ्ठी लिहून शिक्षकाची आत्महत्या

Subscribe

नागपूरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑरेंजनगरमधील शिवनारायण अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने चिठ्ठी लिहून स्वतःचा जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘मी जीवनाला कंटाळलो आहे. पत्नी व मुलांनो मला माफ करा’, अशी चिठ्ठी लिहून शिक्षकाने आत्महत्या केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

असा घडला प्रकार

आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे वय ४८ वर्ष असून महेंद्र मधुकर वैरागडे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र यांच्या पत्नी अश्विनी या उमरेडमधील शाळेत शिक्षका आहेत. यांना मुलगा व मुलगी असे दोन अपत्य असून त्याचा लहानसा परिवार आहे. बुधवारी सकाळी महेंद्र यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. ‘जीवनाला कंटाळलो आहे. मला माफ करा’, असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

- Advertisement -

या प्रकरणी त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातून शुक्रवारी एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाला आणि हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने आपल्या मुलासह स्वतःचा जीव दिला आहे. या घटनेने नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर या महिलेने आपल्या दोन मुलींना घरात बंद करून लहान मुलाला सोबत घेत आपलं आयुष्य संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, गंदम कुटुंब हे तेलंगणातून नांदेड येथे मजुरी करण्यासाठी आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान वयवर्ष ४० असणाऱ्या शंकर गंदम यांना कोरोना झाला. लोहा येथील कोव्हिड रुग्णालयात मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर आपले आयुष्य कसं जाईल या विचाराने तिने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -