घरताज्या घडामोडीमालमत्ता कर थकवणार्‍या विकासकांची पळता भूई थोडी, महापालिकेने वाहने जप्त करताच भरली...

मालमत्ता कर थकवणार्‍या विकासकांची पळता भूई थोडी, महापालिकेने वाहने जप्त करताच भरली कराची रक्कम

Subscribe

मुंबईतील अनेक विभागात मालमत्ता कराच्या थकबाकी वसूलीसाठी गाड्या जप्तींची कारवाई तीव्र करण्यात आली असून तब्बल १७ लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील अनेक विभागात मालमत्ता कराच्या थकबाकी वसूलीसाठी गाड्या जप्तींची कारवाई तीव्र करण्यात आली असून तब्बल १७ लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापोटी सुमारे ५ कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आलेले आहे. या सर्व जप्तीची कारवाई मोठ्मोठ्या विकासक कंपन्यांविरोधात केलेली आहे. काहींनी कराची थकीत रक्कम भरुन वाहने सोडवून नेली आहेत, तर काहींनी अद्यापही कराची रक्कम न भरल्याने पुढील सात दिवसांमध्ये ही वाहने सोडून न नेल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जाईल,असे महापालिकेने स्पष्ट केले.
मालमत्ता कर न भरणार्‍यांविरोधात यंदा प्रथमच अधिक कठोर पावले उचलणार्‍या महापालिकेने थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज आदी वस्तू जप्त करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने मुंबईतील अनेक विभागात मालमत्ता कराच्या थकबाकी वसूलीसाठी गाड्या जप्तींची कारवाई तीव्र करण्यात आली असून तब्बल १७ लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या १७ गाड्यांपैकी बहुतेक गाड्या मर्सिडीज, ऑडी, होन्डासिटी, स्कोडा, हुंदाई क्रेटा, इनोव्हा अशा उच्च श्रेणीतील आहेत.

या १७ पैकी सर्वात जास्त हुंदाई क्रेटा, ऐकॉर्ड, टोयोटा काम्री अशा ३ गाड्या वांद्रे पश्चिम भागातील बिल्डर समीर भोजवाणी यांच्या आहेत. त्यानंतर अंधेरी पश्चिमेतील लष्करीया बिल्डर्सच्या ऑडी आणि मर्सिडीज, साई ग्रुप कंपनीजच्या ऑडी, शेवरलेट क्रुझ आणि वांद्रे पश्चिम येथील फेलीक्स गेराल्ड ऍण्ड क्लारा या गृहनिर्माण संस्थेच्या २ गाड्यांचाही जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय ‘ई’ विभागातील दर्शन टॉवर, ‘एच पूर्व’ विभागातील शमा बिल्डर्स, ‘आर उत्तर’ विभागातील नरोज डेव्हलपर्स, ‘जी दक्षिण’ मधील पोपटलाल जमाल, ‘के पूर्व’ विभागातील चर्मी एंटरप्रायजेझ, इसीएच सिल्क मिल्स, ‘ए’ विभागातील आत्माराम कांबळी आणि ‘आर मध्य’ विभागातील हॉटेल ग्रीन व्हीला यांची प्रत्येकी एक-एक गाडी जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

यापैकी फेलीक्स गेराल्ड ऍण्ड क्लारा यांनी सर्व ६५ लाख रुपयांची थकबाकी गाड्या जप्त करताच भरली. शमा बिल्डर्स यांनी ३ कोटी ७९ लाखापैकी १ कोटी ९० लाख रुपये पालिकेकडे जमा केले. तर नरोज डेव्हलपर्सनेही १ कोटी ६ लाखापैकी रुपये ७८ लाख, लष्करीया बिल्डर्सने ८० लाखापैकी रुपये ५० लाख, इसीएच सिल्क मिल्सने १ कोटी ९० लाखापैकी ५० लाख रुपये आणि दर्शन टॉवर्सने ७२ लाखापैकी ४६ लाख भरुन आपापल्या गाड्या सोडवून घेतल्या. उर्वरित थकबाकी लवकरच भरण्याची हमीही त्यांनी दिलेली आहे. त्यापोटी सुमारे ५ कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आलेले आहे. ज्यांनी ७ दिवसात मालमत्ता कराची थकबाकी भरुन गाड्या सोडवून न घेतल्यास पालिकेकडून थकबाकी वसूलीसाठी गाड्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या कर निर्धारक व संकलक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेली वाहने आणि कंपन्या

- Advertisement -

वांद्रे पश्चिम बिल्डर समीर भोजवाणी : हुंदाई क्रेटा, ऐकॉर्ड, टोयोटा काम्री अशी ३ वाहने

अंधेरी पश्चिमेतील लष्करीया बिल्डर्स : ऑडी आणि मर्सिडीज अशी २ वाहने

साई ग्रुप कंपनीज : ऑडी, शेवरलेट क्रुझ अशी २ वाहने
वांद्रे पश्चिम फेलीक्स गेराल्ड ऍण्ड क्लारा या गृहनिर्माण संस्था : २ वाहने

‘ई’ विभाग – दर्शन टॉवर : १ वाहन

‘एच पूर्व’ – शमा बिल्डर्स : १ वाहन

‘आर उत्तर’ विभाग – नरोज डेव्हलपर्स : १ वाहन

‘जी दक्षिण’ विभाग – पोपटलाल जमाल : १ वाहन

‘के पूर्व’ विभाग – चर्मी एंटरप्रायजेझ : १ वाहन

‘के पूर्व’ विभाग – इसीएच सिल्क मिल्स : १ वाहन

‘ए’ विभाग- आत्माराम कांबळी : १ वाहन

‘आर मध्य’ – हॉटेल ग्रीन व्हीला : १ वाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -