Breaking: महाड इमारत दुर्घटना, ८ जणांना बाहेर काढले, एकाचा मृत्यू तर ७ जखमी!

रायगडमधील महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. काजळपुरा परिसरातील ही घटना असून अर्ध्या तासापूर्वी घडली आहे. माहितीनुसार, आठ ते दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून तारीक गार्ड इमारतीचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्ही २५ लोक सुखरुप बाहेर पडले होते. त्यानंतर आता १५ लोकांना बाहेर काढण्यात यश आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या १५ लोकांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आता या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आपत्ती व्यवस्थापनेची टीम आणि फायर टेंडर या ठिकाणी पोहोचली असून बचाव कार्य सुरू आहे. पुण्याच्या एनडीआरएफच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत.

आता या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ८ जणांना बाहेर काढण्यात आले असून ७ जण जखमी आहे आणि एकाचा मृत्यू झाला आहे.

या इमारतीमध्ये ४७ फ्लॅट होते. जवळपास २०० ते २५० लोक या इमारतीमध्ये राहत होते. इमारतीच्या परिसरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यास मदत करत आहेत.

 

राज्याचे गृहमंत्री यांच्यासोबतच मी मुंबईला आलो आहे. मला सुद्धा ही घटना अर्ध्या तासापूर्वी कळाली असून मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या १५ किंवा २० वर्षांपूर्वी बांधलेली इमारत महाडमध्ये कोसळली आहे. बरेच नागरिक त्या इमारतीमध्ये राहत होते. मी याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण या ठिकाणी रेसक्यू ऑपरेशन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी सरकारशी बोलून एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी लवकर कशी पोहोचू शकले हा आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतु मुंबई किंवा पुण्यावरून एनडीआरएफची टीम तिथे पोहोचण्यासाठी कमीत कमी ४ ते ५ तासांचा कालावधी लागेल. अशा वेळी स्थानिक पातळीवरील टीम या ठिकाणी कशा पोहोचू शकतील?, ढिगाऱ्याखालील नागरिकांना सुरक्षित कशा प्रकारे काढता येईल? आणि त्याप्रमाणे जखमी झालेल्यांवर तातडीने कशा प्रकारे उपचार करता येतील? या दृष्टीकोनातून मी स्थानिक पातळीवर प्रशासनाशी आणि जिल्ह्या पातळीवर प्रशासनाच्या संपर्कात आहे. रेसक्यू ऑपरेशन करणे आणि ही इमारत कशी पडली?, त्याचे आर्किटेक्ट कोणी केले होते?,कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतले होत? या सर्व गोष्टींची चौकशी करणे गरजेचे आहे. – सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

इमारत ५ मजल्यांची होती. त्यातले वरचे ३ मजले कोसळले आहेत. बचाव पथकाला २० ते २५ नागरिकांना बाहेर काढण्यास यश आलं आहे. इमारतीत ४८ ते ५० कुटुंब रहात असून २००हून जास्त नागरिक राहात असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर पोलीस यंत्रणा देखील पोहोचली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात पोहोचवण्याचं काम सुरू आहे. इमारतीला आधी कुठला इशारा दिला होता किंवा काय याचा तपशील पाहावा लागेल. आसपासच्या इमारतींची परिस्थिती देखील तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारत काही फार जुनी नाही. – आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड