घरताज्या घडामोडीलोकसेवा हक्क आयोगाच्या नवीन ५ आयुक्तांना शपथ

लोकसेवा हक्क आयोगाच्या नवीन ५ आयुक्तांना शपथ

Subscribe

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांसाठी राज्य सेवा हक्क आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या पाच आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी शपथ दिली. चित्रा विकास कुलकर्णी (नाशिक),दिलीप मोहनराव शिंदे (पुणे), अभय यावलकर (नागपूर), डॉ. नरुकुल्ला रामबाबू (अमरावती) आणि डॉ. किरण दत्तात्रेय जाधव (औरंगाबाद) यांनी आज राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेवून राज्य आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

शपथविधीनंतर मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तीना पारदर्शक कार्यक्षम आणि समयोचित लोकसेवा देण्यासाठी तसेच शासकीय विभाग, अभिकरणे आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता,उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंमलात आलेला आहे. अधिनियमाच्या कलम १३ पोट नियम-२ अन्वये प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाच आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

महसुली विभागातील आयुक्तांच्या नेमणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल तसेच अधिनियमाने निश्चित केलेल्या उद्देशांना चालना मिळेल, असा विश्वास स्वाधीन क्षत्रिय, यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : जे रस्त्यावर लढतील त्यांना सोबत घेऊन जाणार, UPA सध्या अस्तित्त्वात नाही – ममता बॅनर्जी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -