पालघरमध्ये धबधब्यात बुडून ५ जणांचा मृत्यू

पोहता येत नसल्याने धबधब्यात हे ५ जण बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला

फोटो सौजन्य -ABP न्यूज

मुंबईपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या अंबिका चौक भागात राहणारे १३ लोक गुरुवारी कळमंदवी धबधब्यात स्नान करण्यास गेले होते. परंतु पावसाच्या पाण्यापासून तयार झालेल्या धबधब्याच्या खोलीत अंदाज न आल्याने मुले धबधब्याच्या पाण्यात खोलवर बुडाली. पोहता येत नसल्याने धबधब्यात हे ५ जण बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज या पाचही जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. या नंतर परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला. संध्याकाळी उशिरापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान या घटनेची माहिती देताना पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रवक्ते सचिन नवाडकर यांनी सांगितले की, १३ जण या धबधब्याजवळ फिरायला आले होते, तेथे ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

धबधब्यात आंघोळ करायला गेलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पावसाळ्याच्या पाण्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात हे धबधबे तयार होत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे भेटी देत असतात. तसेच हे सर्व मुले धबधब्याच्या काठावर आंघोळ करत होती परंतु काही लोक निसरड्या जागेमुळे आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले आणि हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच एसपी दत्तात्रय शिंदे, जिल्हा दंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. लॉकडाऊन दरम्यान वाहतुकीवर बंदी आहे. हे मुले जंगलातून आपल्या गावातून ७ किमी अंतरावर धबधब्यावर पोहोचले, असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


संतापजनक! महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार