घर महाराष्ट्र गिरणी कामगारांसाठी लवकरच 5 हजार घरांची सोडत, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

गिरणी कामगारांसाठी लवकरच 5 हजार घरांची सोडत, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

Subscribe

गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळावं यासाठी बैठकीत चर्चा झाली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच, गिरणी कामगारांसाठी 5 हजार घरांची सोडत लवकरच काढली जाणार असल्याची  माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

मुंबई: मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचा हिंसाचा वाटा आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिशय गांभीर्यानं गिरणी कामगारांच्या प्रश्नावंर चर्चा केलेली आहे. गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळावं यासाठी बैठकीत चर्चा झाली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच, गिरणी कामगारांसाठी 5 हजार घरांची सोडत लवकरच काढली जाणार असल्याची  माहितीदेखील त्यांनी दिली आहे. (Mumbai Mill workers 5 thousand houses will be allotted soon for mill workers Chief Minister Eknath Shinde announced)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गिरणी कामगारांना घरं मिळावी, यासाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तब्बल दोन तास या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अनेक प्रश्नांना निकाली काढण्यात आलं आहे. मुंबईमध्ये तसंच मुंबई MMR मध्ये हाऊसिंग स्टॉक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

तसंच, जे गिरणी कामगार मुंबई बाहेर आहेत आणि त्यांना आपल्या शहरानजिक किंवा गावाजवळ घरं घेण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी हे ऐच्छिक ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई MMR मध्ये देखील म्हणजे कल्याण, कोण गावात, पनवेल, ठाण्यात अशा अनेक ठिकाणी ज्या जागा आहेत तिथे गिरणी कामगारांसाठी घरं बांधणं , तसंच त्यांच्यासाठी हाऊसिंग स्टॉक वाढवणं यावर चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली. तसंच, मुंबईत देखील ज्या जागा आहेत. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्यावरदेखील चर्चा झाल्याचं, शिंदेंनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, गिरणी कामगारांचे 1 लाख 74 हजार जे पूर्वी अर्ज आलेले आहेत तेदेखील येत्या तीन महिन्यांमध्ये पात्र, अपात्र ठरवले जाणार आहेत. तसे आदेशही देण्यात आल्याचं ते म्हणाले. तसंच पनवेल आणि कल्याणमध्ये जी घरं आहेत त्यांची डागडुजी युद्धपातळीवर करण्याचे आदेशही MMRDA तसंच, MHADA ला दिले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

- Advertisement -

जवळपास 5 हजार घरांची सोडत लवकरच काढता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, यावरही चर्चा केली गेल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गिरणी कामगारांच्या हक्काची मागणी पूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं.

(  हेही वाचा: Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा गट नाराज; महायुतीत होणार विलिन? )

मुंबईत टेक्स्टाईल मिल म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे अशा सुचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेतून गिरणी कामगारांना घरे देण्याच्या विकल्पाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, सातारा येथील मुळ रहिवासी असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत त्यांच्या इच्छेनुसार मुंबई बाहेर घरे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. गेल्या काही महिन्यात गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ज्या गतिमानपणे कार्यवाही सुरू आहे त्याबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधी आणि गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -