घरCORONA UPDATECoronaUpdate: राज्यातील ५० कोरोनाबाधित रुग्ण बरे; तर ६ जणांचा मृत्यू

CoronaUpdate: राज्यातील ५० कोरोनाबाधित रुग्ण बरे; तर ६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ६७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली. मुंबईत ४३ रुग्ण असून यात मुंबई परिसरातील १० रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात ६७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली. मुंबईत ४३ रुग्ण असून यात मुंबई परिसरातील १० रुग्णांचा समावेश आहे. या ४३ नव्या रुग्णांमुळे मुंबईतील आकडा २७८ वर पोहोचला आहे. तसेच राज्यात ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये वसई-विरार, बदलापूर, ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी एक रुग्ण असून मुंबईतील दोन रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात शुक्रवारी ५९५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३ हजार ०७२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

मृत्यू झालेल्या त्या ६ रुग्णांचे तपशील –

  1. वसई-विरार येथे मृत्यू झालेला ६८ वर्षीय पुरुष हा २९ मार्च २०२० रोजी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठ्वड्यात अमेरिकेहून आला होता. पण भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता.
  2. बदलापूर-ठाणे येथे मृत्यू झालेली महिला ही एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बराच काळापासून बिछान्याला खिळून होती. त्यामुळे तिला बेड सोअरदेखील झाले होते. तिचा कोणत्याही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.
  3. जळगाव येथे मृत्यू झालेला ६३ वर्षीय पुरुष हा जळगावमधील कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तादाब होता. एक महिन्यापूर्वी त्याची अॅन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला.
  4. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेली ५० वर्षीय महिला २८ मार्च रोजी भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता.
  5. मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू पावलेला ६५ वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही परदेशात प्रवास केला नव्हता.
  6. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षाच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील –

अ.क्र.   जिल्हा/मनपा बाधित                      रुग्ण                              मृत्यू
१           मुंबई                                     २७८                               १९
२           पुणे ( शहर व ग्रामीण भाग )              ७०                               २
३           सांगली                                     २५                                ०
४ मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा,जिल्हे ५५                                ३
५ नागपूर                                               १६                                ०
६ अहमदनगर                                          २०                                ०
७ बुलढाणा                                              ५                                 १
८ यवतमाळ                                             ४                                 ०
९ सातारा, औरंगाबाद प्रत्येकी                          ३                                 ०
१० कोल्हापूर, रत्नागिरी प्रत्येकी                        २                                ०
११ सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशिम, जळगाव प्रत्येकी १ १ (जळगाव)
१२ इतर राज्य – गुजरात १ ०
एकूण ४९० २६

निजामुद्दीन येथील व्यक्तींचा कसून शोध

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता. त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १ हजार २२५ व्यक्तींच्या यादींपैकी १ हजार ०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. तर एक जण हिंगोलीतील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -