घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसारथीच्या नाशिक कार्यालयासाठी ५० कोटींच्या निधीला मान्यता

सारथीच्या नाशिक कार्यालयासाठी ५० कोटींच्या निधीला मान्यता

Subscribe

नाशिक : मराठा समाजातील आर्थिक मागास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी नाशिक येथे सारथीचे कार्यालय व्हावे, यासाठी सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे,माजी खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सारथीच्या उभारणीसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

माजी खासदार संभाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून यापूर्वीच सारथीसाठी त्र्यंबकरोडवर पावणेतीन एकर जागा उपलब्ध झाली आहे. आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने सारथीच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

- Advertisement -

मराठा समाजाच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात, यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील आहेत. सारथीचे केंद्र फक्त पुणे येथे होते. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वसतिगृह आणि इतर प्रशिक्षण दिले जात असते. यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथीच्या केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत असे. सारथीचे केंद्र नाशिक येथे व्हावे यासाठी छत्रपती संभाजीराजे, खासदार हेमंत गोडसे, गणेश कदम यांनी पाठपुरावा केला. सहा महिन्यांपूर्वी खासदार गोडसे यांच्या पुढाकारातून नाशिकरोड येथे सारथीचे कार्यालय सुरू झाले.

दरम्यान, नाशिक येथील प्रस्तावित जागेवर सारथीचे कार्यालयासाठी निधीची तरतूद व्हावी, यासाठी माजी खासदार संभाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा सुरू होता. या पाठपुरावाला यश आले आहे. सारथीसाठी सव्वादोनशे कोटी रुपयांच्या निधीची गरज असून उर्वरित निधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. प्रस्तावित सारथीच्या जागेवर आठ मजली दोन इमारती, पाच मजली प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. सारथीच्या इमारतीत एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता असणार असून त्यात प्रशस्त वसतिगृह,अभ्यासिका उभारण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -