घरताज्या घडामोडीनाशकात ५० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; २ वर्षीय मुलीसह ५ अल्पवयीन मुलांना करोनाचा...

नाशकात ५० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; २ वर्षीय मुलीसह ५ अल्पवयीन मुलांना करोनाचा संसर्ग

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास रविवारी (दि.२४) ६६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १२ नाशिक शहरातील, मुखडे (येवला) व सायेगाव (मनमाड) येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहरातील लेखानगर येथील एकाच कुटुंबातील १० वर्षीय मुलासह २ व ८ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात ९५० बाधित रुग्ण असून मालेगावात ६९६ व नाशिक शहरात ८८ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत ९५० पैकी ५० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मालेगावात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होवून आता नाशिक शहरात बांधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याचे गेल्या पाच दिवसांतील आकडेवारीवरुन समोर आले आहे. शहरात रविवारी आढळून नवे १२ रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. ते बांधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आले आहेत. सिडकोतील राणा प्रताप चौकातील एका कुटुंबातील दोन महिला करोनाबाधित आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबातील एक युवक आधीच बाधित असून त्यांच्या संपर्कात आल्याने दोन महिलांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता
राणाप्रताप चौक येथील एका कुटुंबात एकूण पाच पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. विसेमळा, कॉलेज रोड येथील बाधित पोलिसामुळे १७ व २३ वर्षीय मुलींना करोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण

राणाप्रताप चौक, सिडको (२), वडाळा (५), लेखानगर (३), विसेमळा, कॉलेज रोड (२).

१५८ रुग्ण दाखल

जिल्ह्यात रविवारी (दि.२४) दिवसभरात १५८ संशयित रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय ६, नाशिक महापालिका रुग्णालये ९, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २, मालेगाव महापालिका रुग्णालये १२, नाशिक ग्रामीण रुग्णालयांमध्ये १२९ रुग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisement -

३४७ अहवाल प्रलंबित

नाशिक जिल्ह्यात रविवारपर्यंत ९ हजार ७७८ संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९३८ रुग्ण बाधित व ८ हजार ४९३ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. अद्याप ३४७ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. प्रलंबित रिपोर्टमध्ये नाशिक ग्रामीणचे १००, नाशिक शहर ८५, मालेगाव शहरातील १६२ आहेत. ९३८ पैकी ७२० रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १६८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —-९५०
मालेगाव शहर —–६९६ (मृत ४५)
नाशिक शहर ——८८ (मृत ३)
नशिक ग्रामीण —–१२७ (मृत १)
अन्य ———-३९ (मृत १)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -