घरक्राइम९ लाखाच्या कर्जाच्या मोहबदल्यात ५० लाख अदा, तरीही २० लाख बाकीच; शहराला...

९ लाखाच्या कर्जाच्या मोहबदल्यात ५० लाख अदा, तरीही २० लाख बाकीच; शहराला सावकारीचा फास

Subscribe

नाशिक : खासगी सावकाराने पैशांसाठी तगादा लावल्याने जगताप दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिक शहरात एका हॉटेल व्यावसायिकाने 9 लाख रुपये व्याजने घेत सावकाराला तब्बल 50 लाख 90 हजार रुपये व्याज दिले. तरीही सावकाराने व्यावसायिकासह त्याच्या पत्नी, मुलीस अश्लिल शिवीगाळ करत आणखी 20 लाखांची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरेश पुजारी (रा. राजीवनगर) यांनी सावकाराविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विजय शंकर देशमुख (रा. कर्मयोगीनगर, गोविंदनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पुजारी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी हॉटेल व्यवसायात अडचण आल्याने एका बँकेतून सेवानिवृत्त झालेले ओळखीचे विजय देशमुख यांच्याकडून मुंबई नाका परिसरातील एका हॉटलमध्ये 9 लाख रुपये 5 टक्के व्याजाने घेतले होते. पुजारी यांनी 2007 पासून ते 2022 पर्यंत 9 लाखांच्या रक्केमवर 44 लाख 90 हजार रुपये रोखीने देशमुख यांना व्याज दिले आहे. उर्वरीत सहा लाख रुपयांची रक्कम संशयितांच्या सांगण्यावरुन आरटीजीएस पद्धतीने तक्रारदार पुजारींच्या बँक खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर केले. पुजारी हे 16 वर्षापासून 50 लाख 90 हजारांचे व्याज देत आहे. व्यवसायात अडचण असल्याने व्याजाचे पैसे देण्यास असमर्थ असल्याने पुजारी यांनी व्याजाची रक्कम देण्यास नकार दिला. संशयित देशमुख यांनी पुजारी यांच्याकडे आणखी 20 लाखांची मागणी करत वारंवार कॉल करत शिवीगाळ करत वे ठार मारण्याची धमकी दिली.

सुरेश पुजारींच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित देशमुख यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. तपासात सत्यता पडताळणी करून पुढील कारवाई केली जाईल. : चंद्रकांत अहिरे, तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -