आमच्याकडे 50 आमदार, बहुमत चाचणीची चिंता नाही, एकनाथ शिंदेंना विश्वास

We have 50 MLAs and the majority is not worried about the test, said Shiv Sena rebel leader Eknath Shinde

आज शिवसेनेच्या सर्व आमदारांनी कामाख्या देविचे दर्शन घेतले. यावेळी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी आमच्याकडे 50 आमदार असून आम्हाला कोणतीच बहुमत चाचणीची चिंता नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सगळ्या आमदारांनी आज कामाख्या देवीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. येथे आल्यानंतर कामाख्या देवीचे दर्शन सगळ्यांचे झाले. एक वेगळा आनंद समाधान सर्व आमदारांमध्ये या ठिकाणी आपण पाहिले असेल. येथे आपण पाहिले का कोणी जबरजस्तीने आले आहे. येथे सगळ्यांनी मस्त मोकळे पणाने फिरत दर्शन घेतले आहे. त्यामुळे सगळे आनंदामध्ये सगळ्यांनी समाधानाने दर्शन घेतले आहे. आम्ही उद्या सगळ्या आमदारांसह मुंबईत येऊ, असे शिंदे म्हणाले.

आमच्या कडे मेजॉरीटी –

आपल्याला माहीत आहे. आमच्याकडे 50 लोक आहेत. 40 + 10 हे 50 लोक म्हणजे टूथर्ड पेक्षा जास्त मेजॉरीटी आमच्या शिवसेना गटाकडे आहे. यामुळे आम्हाला कोणतीच बहुमत चाचणीची चिंता नाही. जी काही प्रक्रिया असेल त्यात आम्ही पास होऊ. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कारण लोकशाहीत नंबर आणि बहुमताला महत्व असते. या देशात घटना आणि कायदा नियम यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. लोकशाहीत नंबर आणि बहुमताला महत्त्व आहे, असेही शिंदे यांनी सांगीतले.

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला देणार भेट –

आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण वंदन करणार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पण वंदन करणार ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही हिंदुत्वाला पुढे नेणारी शिवसेना आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पण वंदन करणार. ही शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. राज्यातल्या जनतेला सुख, समृद्धी, सामाधानी, सुजलाम सुफलाम करण्यासाठी आणि महाराष्ट्राला प्रगती पथावर नेहण्यासाठी आम्ही हा हिंदूत्वाचा मुद्दा बाळासाहेबांचा मुद्दा पुढे घेऊन जात आहोत, असे शिंदे म्हणाले, आसा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.