राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. कारण एकाबाजूला राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि दुसऱ्याबाजूला ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५० नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एकट्या पुणे शहरातील ३६ ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ५०० पार गेली आहे.
आज राज्यात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत. पुणे मनपामध्ये ३६, पिंपरी चिंचवड मनपामध्ये ८, पुणे ग्रामीणमध्ये २, सांगलीत २, ठाण्यात १, मुंबईत १ अशा एकूण ५० ओमिक्रॉन रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ५१०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात कुठे-कुठे किती ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले?
मुंबई – ३२८ रुग्ण
पुणे मनपा – ४९ रुग्ण
पिंपरी चिंचवड – ३६ रुग्ण
पुणे ग्रामीण – २३ रुग्ण
ठाणे मनपा – १३ रुग्ण
नवी मुंबई, पनवेल – प्रत्येकी ८ रुग्ण
कल्याण डोंबिवली – ७ रुग्ण
नागपूर आणि सातारा – प्रत्येक ६ रुग्ण
उस्मानाबा – ५ रुग्ण
वसई विरार – ४ रुग्ण
नांदेड – ३ रुग्ण
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली – प्रत्येकी २ रुग्ण
लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर – प्रत्येकी १ रुग्ण
हेही वाचा – Mumbai Corona Update: चिंताजनक! मुंबईत २४ तासांत ८,०३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; धारावीत आढळले ६० रुग्ण