Dharavi Corona Cases: मुंबईतील धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, रूग्णसंख्या ५०० पार

corona update ndia reports 1,79,723 fresh cases & 146 deaths in the last 24 hours omicron patient cross
Corona Update: देशात कोरोनाचा प्रकोप, रुग्णसंख्या दीड लाख पार, मात्र मृतांचा आकडा घटला

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने सुद्धा देशात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. परंतु राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २० हजार १८१ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु मुंबईतील धारावीत कोरोना विषाणूने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. येथील रूग्णसंख्या ५०० च्या वर गेली आहे. त्यामुळे हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक समजला जात आहे.

२४ तासांत धारावीमध्ये २४ टक्क्यांची वाढ

मुंबईतील संख्यसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल २९.९० टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत धारावीमध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय रूग्ण संख्या ५५८ इतकी आहे. मुंबई पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मागील २४ तासांत ९३ पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९ हजार ६५७ इतक्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता

मुंबईत कोरोना रूग्णसंख्या वाढत असून अद्यापही लोकांना कोरोना संकटाचं गांभीर्य नाहीये. नागरिकांना सुद्धा कोविड-१९ चं पालन करणं आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊन होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे विकेंड किंवा मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत रूग्णसंख्या २० हजारांच्या घरात

धारावीला लागून असलेल्या माहिम आणि दादरमध्ये कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. काल गुरूवारी दादरमध्ये २२३ रूग्ण आढळून आले होते. तर माहिममध्ये ३०८ रूग्ण आढळून आले होते. मुंबईत दिवसागणिक रूग्णसंख्या २० हजारांच्या घरात गेल्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं होतं.


हेही वाचा : PM Modi Vs CM Mamata: पीएम मोदींनी हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर ममता बॅनर्जींना राग अनावर, म्हणाल्या…