घरमहाराष्ट्रक्रिप्टोकरन्सीमध्ये ५०० कोटींचा 'झोल'झाल, अर्जुन खोतकरांच्या जावयावर कारवाई

क्रिप्टोकरन्सीमध्ये ५०० कोटींचा ‘झोल’झाल, अर्जुन खोतकरांच्या जावयावर कारवाई

Subscribe

Vijay Zol cryptocurrency | अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह १५ जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच, किरण खरात यांनीच ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

जालना – शिंदे गटातील आमदार अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल याने क्रिप्टोकरन्सीमध्ये ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उद्योजक किरण खरात यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

किरण खरात हे घनसावंगी तालुक्यात राहत असून क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रमोटर म्हणून काम करतात. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली होती. मात्र, मार्केट व्हॅल्यू घसरल्याने विजय झोल यांनी किरण खरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्यावर पिस्तुलही रोखले गेले. याप्रकरणी किरण खरात यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय झोल हे टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधारही राहिले आहेत.

- Advertisement -


अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह १५ जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच, किरण खरात यांनीच ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

हेही वाचा – कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे शिंदे गटात जातोय, अर्जुन खोतकर हतबल अन् भावूक

- Advertisement -

“खोतकर आणि झोल कुटुंबियांनी किरण खरात यांची सुपारी दिली. खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हा दाखल करा, मोक्का लावा,” अशी मागणी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी केली आहे.

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाचा कावीळ झाला आहे. संताजी आणि धनाजी जसे विरोधकांना दिसायचे तसे खोतकर आणि झोल आमदारांना जेवताना, झोपताना दिसतो. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून अंदाजे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या महाशयाला काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी मी पोलिसांकडे करणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. शिवाय आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गोरंट्याल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खोतकरांनी केलीय. क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्या लोकांचे पैसे बुडाले आहे, त्या लोकांचे पैसे आमदारांनी द्यावे असंही ते म्हणाले. लोकांचे बुडालेले पैसे आणून द्या, अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा देखील खोतकरांनी दिला. आमदाराने हा विषय माझ्या परिवारापर्यंत नेला असून मी एवढ्या खालच्या थराला कधी गेलो नाही. माझ्या जावयाचे आणि किरण खरात यांचे चांगले संबंध असून माझ्या जावयाने एवढ्या अडचणीच्या काळातही किरण खरातला पैशांची मदत केली. त्यांच्यातील व्यवहार देखील पारदर्शक झाला असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -