घरमहाराष्ट्रसिद्धिविनायक न्यासाकडून शहीदांच्या कुटुंबाला ५१ लाखांची मदत

सिद्धिविनायक न्यासाकडून शहीदांच्या कुटुंबाला ५१ लाखांची मदत

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सिद्धिविनायक न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० हून अधिक जवान शहीद झाले असून अनेक जवान या हल्ल्यात जखमी देखील झाले आहेत. इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याने देशभरात या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. आज जम्मू काश्मिरमध्ये शोकाकूल वातावरणात सीआरपीएफ जवानांनी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शहीदांना मानवंदना दिली आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात जे जवान शहीद झाले आहेत त्या जवानांना सिद्धिविनायक न्यासाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

सिद्धिविनायक न्यासाकडून ५१ लाखांची मदत

सीआरपीएफच्या शहीद जवांनाच्या कुटुंबियांना सिद्धिविनायक न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जे जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत त्या जवानांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आल्याचे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारची मदत

पुलवामा जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा देखील समावेश आहे. या हल्ल्यामध्ये संजय राजपूत आणि नितीन राठोड या हे जवान पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. या शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


वाचा – Terror attack: दहशतवाद्यांना सोडणार नाही – पंतप्रधान मोदी

- Advertisement -

वाचा – Pulwama Terror Attack : हल्ल्यात पाकचा थेट हात – अरुण जेटली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -