512 किलो कांद्याला मिळाले फक्त 2 रुपये; बार्शीतील शेतकऱ्याने अजित पवारांकडे मांडली कैफियत

महाराष्ट्रात कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील राजेंद्र चव्हाण यांना ५१२ किलो कांद्याला एक रुपया प्रति किलो इतका भाव मिळाला. वाहतूक आणि अन्य खर्च गेल्यानंतर चव्हाण यांच्या हातात अवघे अडीच रुपये उरले. त्यामुळे राजेंद्र चव्हाणांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

महाराष्ट्रात कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील राजेंद्र चव्हाण यांना ५१२ किलो कांद्याला एक रुपया प्रति किलो इतका भाव मिळाला. वाहतूक आणि अन्य खर्च गेल्यानंतर चव्हाण यांच्या हातात अवघे अडीच रुपये उरले. त्यामुळे राजेंद्र चव्हाणांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. याबाबत अजित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. (512 kg onion only got 2 rupees The farmer in Barshi presented the grief to Ajit Pawar)

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीतील बोरगाव झाडेचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. सोलापूर मार्केट यार्डात, बार्शीचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 17 फेब्रुवारीला, 512 किलो कांदा विकला. त्यांना किलोला १ रुपया दर देण्यात आला. ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाईचा खर्च वजा करुन व्यापाऱ्यानं,च्या 10 पोती कांद्याला, २ रुपयांचा चेक दिला. ही शेतकऱ्यांची स्थिती आहे. (सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं ४ क्विंटल कांदा विकल्यानंतरही त्याला १ रुपयाही मिळाला नाही. उलट खिशातून ३१८ रुपये द्यावे लागल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मात्र, आम्ही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नॉर्मच्यापेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकची रक्कम दिल्याचे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येते. परंतु, आम्ही ज्यावेळी महाराष्ट्रातील विविध भागांत फिरलो, त्यावेळी जाहीर केलेली मदत अद्याप सर्वत्र पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतीमालाला किंमत नाही, असे निदर्शनास आले’, असे अजित पवार यांनी सांगितले.

‘कांदा उत्पादकांना न्यायदेण्यासाठी कांद्यांची निर्यात केली पाहिजे, त्यानंतर लगेचच काद्याचे भाव वाढतील. बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याची मागणी आहे. ज्याप्रकारे साखर उत्पादकाला न्याय देण्यासाठी साखरेची निर्यात केली. त्यापार्श्वभूमीवर काद्यांचीही निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा’, असेही अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – 5 क्विंटल कांद्याच्या विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ 2 रुपयांचा चेक; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल