घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ५२५ नव्या रुग्णांची वाढ, ९...

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ५२५ नव्या रुग्णांची वाढ, ९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज २०६ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. हे सर्व रुग्ण एकट्या पुणे मनपा विभागात आढळले आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ५२५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ६७ हजार ९१६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ हजार ४७६ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

आज दिवसभरात राज्यात ९९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ७७ लाख १५ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८१ लाख ३८ हजार १८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६७ हजार ९१६ (१०.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २८ लाख ८७८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ५९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यात आज २०६ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. हे सर्व रुग्ण एकट्या पुणे मनपा विभागात आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५ हजार २११ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी ४ हजार ६२९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ हजार ३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८ हजार ९४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ४३८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.


हेही वाचा – COVID 4th wave: कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; टास्क फोर्सकडून मार्गदर्शनाची अपेक्षा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -