घरCORONA UPDATEराज्यात रविवारी कोरानाचे 541 नवे रुग्ण, 546 जणांची मात

राज्यात रविवारी कोरानाचे 541 नवे रुग्ण, 546 जणांची मात

Subscribe

मुंबई : गेल्या दोन वर्षांपेक्षा आता कोरोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. रविवारी 541 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

फेब्रुवारी-मार्च 2020मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्या तुलनेत आता परिस्थिती खूपच नियंत्रणात आहे. मात्र तरीही, कोरोना संकटाचा अंत घोषित करण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी अलिकडेच म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण रोज आढळतच आहेत. राज्यात आज 541 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 3 हजार 702 सक्रिय रुग्ण असून त्यात सर्वाधिक पुण्यात आणि मुंबईत आहेत. पुण्यात 1 हजार 245 तर मुंबईत 732 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवासंपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दुर्घटनांनंतर चालणारा बुलडोझर बेदरकार प्रशासनावर कधी चालणार?

राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रविवारी 546 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत कोरोनातून बऱ्या झालल्या रुग्णांची संख्या 79,67,314 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के आहे. तर दिवसभरात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर 1.82 टक्के झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

- Advertisement -

देशात 4777 नवे रुग्ण
देशामध्ये शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.58 टक्के इतका होता. तर, 5 हजार 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली. भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 43 हजार 994 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.10 टक्का आहे. रविवार सकाळपर्यंत 5 हजार 196 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 39 लाख 95 हजार 610 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.72 टक्के इतका आहे.

हेही वाचा – सणासुदीत ‘व्होकल फॉर लोकल’ व्हा, ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा चीनला शह

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -