घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये एका दिवसात तब्बल 550 नवे पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये एका दिवसात तब्बल 550 नवे पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१7) दिवसभरात तब्बल 550 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण १३१, नाशिक शहर ३६९, मालेगाव ७ आणि जिल्ह्याबाहेरील ४३ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात नाशिक ग्रामीण 3, नाशिक शहर, मालेगाव आणि जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूूण कोरोनाबाधितांची संख्या तब्बल साडेसात हजारांवर पोहोचली असून, एकट्या नाशिक शहरातील हा आकडा साडेचार हजारांवर गेला आहे.

जिल्ह्यात आजवर ५ हजार 723 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण १ हजार २९१, नाशिक शहर ३ हजार ३६6, मालेगाव 9५4 आणि जिल्ह्याबाहेरील ११२ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 588 रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 70२, नाशिक शहर 1 हजार ६8१, मालेगाव 1४७ आणि जिल्ह्याबाहेरील ५८ रूग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात १ हजार ४१५ संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय ११, नाशिक महापालिका रूग्णालय १ हजार १३१, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ८, मालेगाव रूग्णालय १५, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 1७२ रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-8682 (मृत-371)
नाशिक ग्रामीण-2075 (मृत-82)
नाशिक शहर-5241 (मृत-194)
मालेगाव शहर-1181 (मृत-80)
जिल्ह्याबाहेरील-185 (मृत-15)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -