जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन; २१४ गुन्ह्यांत ५७४ जणांवर कारवाई

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आज २१४ गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांत दिवसभरात ५७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

574 people charged due to violation of social distancing gatherings act
गुदव्दारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आज, शनिवारी २१४ गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांत दिवसभरात ५७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १६२ जणांना जामिनावर तर १११ जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. ३०१ जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

गेल्या १२८ दिवसांत मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १८ हजार ४४० गुन्ह्यांची नोंद करताना ४२ हजार ३३३ जणांवर कारवाई केली आहे. त्यात १९ हजार १९७ जणांना जामिनावर तर १५ हजार ५५५ जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तर ७ हजार ५८१ जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जमावबंदीचे आदेश असतानाही काहीजण या आदेशाचे उल्लघंन करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध २० मार्चपासून मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती. यातील सर्वाधिक ८ हजार ११४ गुन्हे उत्तर मुंबईत झाले आहे. दक्षिण मुंबईत १ हजार ७३५ गुन्हे, पूर्व मुंबईत २ हजार ९९२ गुन्हे, मध्य मुंबईत २ हजार ५६५ गुन्हे, पश्चिम मुंबईत ३ हजार ३४ गुन्ह्यांचा समावेश आहे. मास्क न वापरल्याप्रकरणी शनिवारी ८३ जणांवर तर २० मार्चनंतर आतापर्यंत ५ हजार १४० जणांवर कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – चिंताजनक! राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण; ९३ पोलिसांचा मृत्यू