घरमहाराष्ट्रराज्य नाट्य स्पर्धा २०१९ : ‘द लास्ट व्हाईसरॉय’नाशिक केंद्रात प्रथम

राज्य नाट्य स्पर्धा २०१९ : ‘द लास्ट व्हाईसरॉय’नाशिक केंद्रात प्रथम

Subscribe

५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अकॅडमीने सादर केलेल्या ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे.

५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अकॅडमीने सादर केलेल्या ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम पारितोषिक तर ओझरच्या एच.ए.ई. डब्ल्यू.आर.सी रंगशाखेचे ‘प्रार्थनासूक्त’ या नाटकाने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. या दोन्ही नाटकांचीअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून नाट्यसेवा, नाशिक या संस्थेचे ‘साधे आहे इतकेच’ या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. सावानाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ३ डिसेंबर रोजी नाशिक केंद्रावरील निकाल जाहीर केला. दरम्यान, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाम अधटराव, संदीप देशपांडे, किर्ती मानेगांवकर यांनी काम पाहिले. विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

निकाल पुढीलप्रमाणे

दिग्ददर्शन : प्रथम – महेश डोकफोडे (‘द लास्ट व्हाईसरॉय’)
द्वितीय – हेमंत सराफ (प्रार्थनासूक्त)

- Advertisement -

प्रकाश योजना

प्रथम – कृतार्थ कंसारा (‘द लास्ट व्हाईसरॉय’)
द्वितीय – आकाश पाठक (प्रार्थनासूक्त)

- Advertisement -

नेपथ्य

प्रथम – मंगेश परमार (‘द लास्ट व्हाईसरॉय’)
द्वितीय – गणेश सोनावणे (काठपदर).

रंगभूषा

प्रथम – माणिक कानडे (‘द लास्ट व्हाईसरॉय’)
द्वितीय – सुरेश भोईर (ड्रीम युनिवर्स)

उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक

अक्षय मुडवदकर, पूनम पाटील (‘द लास्ट व्हाईसरॉय’)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -