Homeमहाराष्ट्र6 December : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींसाठी मुंबईत बेस्टची विशेष सुविधा

6 December : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींसाठी मुंबईत बेस्टची विशेष सुविधा

Subscribe

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींसाठी मुंबईत बेस्टच्या विशेष सुविधांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला शिवाजी पार्क येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन केले आहे. तसेच मुंबई महापालिकेसोबतच बेस्ट उपक्रमातर्फे 4, 5 आणि 6 डिसेंबरला आरोग्य शिबिर, विद्युत व्यवस्था, बससेवा, मोफत अन्नदान आदी विशेष सेवासुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बेस्ट उपक्रमामार्फत दरवर्षी दादर, चैत्यभूमी परिसरात विविध सेवासुविधा उपलब्ध करण्यात येतात. (BEST special facilities in Mumbai for followers on the occasion of Mahaparinirvana Day.)

हेही वाचा : Girish Mahajan : महायुतीत सारं काही आलबेल; आमच्यात मतभेद नाही, महाजनांनी सांगितले…

बेस्टकडून 4 ते 7 डिसेंबर या कार्यकाळात विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. दादर रेल्वेस्थानक येथून चैत्यभूमीसाठी 4 डिसेंबरपासून ते 7 डिसेंबरपर्यंत दररोज 15/20 मिनिटांच्या प्रस्थांतराने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच 4 डिसेंबरला मुंबईच्या विविध भागांमधून चैत्यभूमीसाठी बसमार्ग क्रमांक 200, 241, A – 351 व 354 ही बससेवा प्रवर्तित करण्यात येणार आहेत. 6 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथून प्रवर्तित होणा-या बसमार्ग क्रमांक C 33, A 164, 241, C 305, A 351, 354, A 357, 385, C 440 आणि C 521 या बसमार्गांवर अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येईल. जेणेकरुन नियमित प्रवासभाडयात प्रवाशांना चैत्यभूमी येथे पोहचणे सहज सोपे होईल. 6 डिसेंबर रोजी मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊ इच्छिणा-या अनुयायांकरिता पुढील विशेष बसफे-यांचे आयोजन करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणा-या प्रवाशांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात दैनंदिन बसपास 60 रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Bacchu Kadu : भाजपाकडून शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न; बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…

तसेच अनुयायांकरिता मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि प्रथमोपचार यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी वैद्यकीय विभागाचे डॉक्टर्स, मिश्रक व वैद्यकीय परिचर यांचा समावेश करण्यात आला आहे.


Edited By Komal Pawar Govalkar