ओमायक्रोनच्या २६८ बाधित रुग्णांपैकी B.A.4 चे ६ आणि B. A.5 चे व्हेरियंटचे १२ रुग्ण

मुंबई महापालिकेने कोरोना जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १३ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. ३६७ नमुन्यांची चाचणी केली असता त्यापैकी २६९ नमुने मुंबईतील तर उर्वरित नमुने मुंबई बाहेरील होते. या २६९ नमुन्यांपैकी २६८ अर्थात ९९.६३% नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

India Corona Update 11,499 fresh COVID19 cases and 255 deaths in the last 24 hours

मुंबई महापालिकेने कोरोना जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १३ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. ३६७ नमुन्यांची चाचणी केली असता त्यापैकी २६९ नमुने मुंबईतील तर उर्वरित नमुने मुंबई बाहेरील होते. या २६९ नमुन्यांपैकी २६८ अर्थात ९९.६३% नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. तर एक नमुना हा इतर उपप्रकाराने बाधित आहे. ओमायक्रोनच्या २६८ बाधित रुग्णांपैकी बी.ए.४ चे ६, बी.ए.५ व्हेरियंटचे १२ रुग्ण आहेत. (6 patients with B.A.4 and 12 patients with B. A.5 variant)

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस न घेतलेल्या १०७ बाधित रुग्णांपैकी ३ जणांचा मृत्यू देखील ओढवला आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

१३ व्या फेरीतील २६९ चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण

  • ० ते २२ या वयोगटात ३३ जण (१२ टक्के) ओमायक्रॉन बाधित तर १ जण इतर उपप्रकाराने बाधित
  • २१ ते ४० या वयोगटातील १०८ रुग्ण (४० टक्के) ओमायक्रॉनने बाधित
  • ४१ ते ६० या वयोगटात ५५ रुग्ण (२१ टक्के) ओमायक्रॉनने बाधित
  • ६१ ते ८० या वयोगटातील ५१ रुग्ण (१९ टक्के) ओमायक्रॉनने बाधित
  • ८१ ते १०० या वयोगटातील २१ रुग्ण (८ टक्के) ओमायक्रॉनने बाधित

चाचण्या करण्यात आलेल्या २६९ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २९ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ८ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ६ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १५ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते.

२६९ पैकी ८ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. पैकी २ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १५४ रुग्णांपैकी ३१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले.

२६९ रुग्णांपैकी १०७ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर ५ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. एका रुग्णाला वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करावा लागला. रुग्णालयात दाखल या २२ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून या तीनही रुग्णांना सहव्याधी देखील होत्या.

ओमायक्रोन या उप प्रकाराने २६८ बाधित रुग्णांपैकी बी.ए.४ चे ६ आणि बी ए.५ व्हेरियंटचे १२ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण ३ जून ते १६ जून २०२२ या कालावधीतील आहेत. त्यातील एक १६ वर्षाची मुलगी तर २ पुरुष व २ महिला या ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आहेत. हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.

बी.ए.४ व्हेरियंटच्या ६ रुग्णांपैकी ४ जणांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत तर उर्वरित दोघांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही व या दोन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते.

बी ए.५ व्हेरियंटच्या १२ रुग्णांपैकी ७ जणांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर ५ जणांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही. या ५ पैकी एका रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते.


हेही वाचा – सांगलीतील ‘त्या’ घटनेचे धक्कादायक सत्य; आत्महत्या नवे हत्याच!