घरमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

Subscribe

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछल येथे आज, शुक्रवारी दुपारी गणपती विसर्जन करताना ६ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गावापासून जवळच असलेल्या अमरावत तलावात हे तरूण गेले असता याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तलावाच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यभरात पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. यंदा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने सर्व धरण आणि तलावे पाण्याने शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. छल गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान त्या तरुणांचे मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरू असून प्रशासनासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही आहेत मृतांची नावं –

  1. कैलास संजय चित्रकथे (वय १७)
  2. सचिन सुरेश चित्रकथे (वय१९)
  3. विशाल मंगल चित्रकथे (१७)
  4. दीपक सुरेश चित्रकथे (वय२१)
  5. रविंद्र शंकर चित्रकथे  (२९)
  6. सागर बाबा चित्रकथे (२०)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -