उदय सामंत हल्लाप्रकरणी ६ जणांना अटक

minister uday samant death threat in nana patole congress meeting nanar refinery

माजी मंत्री आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर मंगळवारी पुण्यातील कात्रज परिसरात संतप्त शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात सामंत यांच्या वाहनाची काच फुटली. या हल्लाप्रकरणी उदय सामंत यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यापैकी ६जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीतील शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात आणि ४ शिवसैनिकांचा समावेश आहे. पुणे सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सर्वांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. त्यानंतर हाती आलेल्या आरोपींवर २५२, १२०, ३०७, ३३२ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज चौकात माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची सभा सुरू होती. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी हजर होते. उदय सामंतांची गाडी पुण्यातील दगडूशेठ मंदिराकडे जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

विचार बदलला म्हणून काय ठार माराल – उदय सामंत
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुणे दौर्‍यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र अशा प्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाहीत. अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणारही नाही. गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आईवडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ याला उत्तर आहे. अंत पाहू नका.