Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिल्ली, महाराष्ट्र, यूपीतून ६ दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

दिल्ली, महाराष्ट्र, यूपीतून ६ दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

दहशतवाद्यांचे मॉड्यूल केले उद्ध्वस्त, पाक प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांचा समावेश

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात रेकी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यात पाकिस्तान प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे. या दहशतवाद्यांकडून स्फोटकांसह शस्त्रास्त्र जप्त करण्यात आलेत. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी घातपाताच्या तयारीत होते. गेल्या महिनाभरापासून पोलिसांचं हे ऑपरेशन सुरू होतं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस हा या दहशतवाद्यांना पैसा पुरवत होता.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना टार्गेट करण्यासाठी हे दहशतवादी कट रचत होते. हे दहशतवादी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात रेकी करत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. दहशतवादी नेमक्या कोणत्या उद्देशाने आलेले आहेत आणि त्यांचा मूळ हेतू काय, हे आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -