महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना मोठा दिलासा; आरोग्य विभागात ६ हजार कोटींची तरतूद

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या कोरोनाचा संसर्गाने अनेकांचे बळी गेले. कंपन्या, रोजगार बंद पडले. सामान्य लोकांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणे परवडते. मात्र पालिका रुग्णालयात ठाणे, कर्जत, रायगड, पालघर, मीरा भाईंदर, नवी मुंबई , पनवेल आदी. भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी दररोज येत असतात. मुंबईतील दिड कोटींपेक्षाही जास्त लोकसंख्या असल्याने मुंबई महापालिकेच्या सायन, केईएम, नायर या प्रमुख रुग्णालयावर व इतर १७ सर्वसाधारण रुग्णालयांवर मोठा ताण येतो. त्यामुळेच पालिकेने आता रुग्णालयांची संख्या वाढविणे, खाटा वाढविणे, रूग्णालय पुनर्विकास करणे आदी कामे हाती घेतली आहेत.

याअंतर्गत, गोवंडी शताब्दी रूग्णालय : ११० कोटी, एम टी अगरवाल रूग्णालय : ७५ कोटी, सायन रुग्णालय : ७० कोटी, भांडुप येथील सुपर स्पेशालिटी रूग्णालय : ६० कोटी, वांद्रे भाभा रूग्णालय : ५३.६० कोटी, कुर्ला विभागात रूग्णालयासाठी : ३५ कोटी भूखंड विकास, ऍक्वर्थ कुष्ठरोग रूग्णालय : २८ कोटी, नायर दंत रूग्णालय : १७.५० कोटी, कामाठीपुरा सिध्दार्थ : १२ कोटी रुपये.

मुरली देवरा नेत्र रूग्णालय, केईएम रूग्णालय : ७ कोटी रुपये, ओशिवरा प्रसूतिगृह : ९.५० कोटी, कूपर रूग्णालय : ५ कोटी रुपये, टाटा कंपाऊंड, हाजी अली : २ कोटी रुपये, वसतिगृह, केईएम रूग्णालयात : १ कोटी प्रोटॉन थेरेपी कर्करोग उपचार करण्यासाठी भरीव निधींची तरतूद केली आहे.

मलनि:सारण प्रकल्प : ३५६६.७८ कोटी रुपये

मुंबईतील दीड कोटी जनता व मुंबईबाहेरून कामधंद्यासाठी मुंबईत येणारे ४० लाख लोक यांचे संपूर्ण दिवसाचे मलमूत्र वाहून नेण्याची कामे पालिका मलनि:सारण वाहिनीद्वारे करण्यात येते. त्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी एकूण २०४५.६३ किमी लांबीच्या मलवाहिन्याचे जाळे आहे. सध्या काही ठिकाणी नवीन मलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. तर काही कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी अर्थसंकल्पात ३५६६.७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


हेही वाचा : माझ्याकडे खूप मसाला, वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार, नाना पटोलेंचा तांबेंना इशारा