घरमहाराष्ट्रबोअरवेलमध्ये पडलेल्या रवीची १५ तासानंतर सुटका

बोअरवेलमध्ये पडलेल्या रवीची १५ तासानंतर सुटका

Subscribe

२०० ते २५० फूट खोल बोअरवेलमध्ये रवी पडला. मात्र तो आठ फुटावर अडकला होता. कालपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर १५ तासानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये ६ वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. या मुलाला तब्बल १५ तासानंतर बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळेगावात ही घटना घडली आहे. सहा वर्षाचा रवी भिल खेळता खेळता रस्त्याच्या कडेला खोदलेल्या बोअरवेलमध्ये अचानक पडला. २०० ते २५० फूट खोल बोअरवेलमध्ये रवी पडला. मात्र तो आठ फुटावर अडकला. काल दुपारपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १५ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रविला बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले.

- Advertisement -

रविला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

रविला बाहेर काढण्यासाठी ‘जेसीबी’च्या साह्याने त्याच्या समांतर एका बाजूने चार फूट खड्डा खोदण्यात आले. बोअरवेलमधून रवीचा रडण्याचा आवाज येत होता. लवकरच त्याला सुरक्षित बाहेर काढू, असा दावा प्रशासन केला होता. दरम्यान, रवीला वाचवण्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज असलेली रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल आहे. त्याचसोबत डॉक्टरांची टीम देखल घटनास्थळी आहे. बोअरवेलमधून रवी रडत रडत मला वाचवा, बाहेर काढा असे जोरजोरात ओरडत होता. रविला वाचवण्यासाठी जिल्हाप्रशासन, ग्रामस्थ आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी होती. रवीला बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -

खेळता खेळता पडला बोअरवेलमध्ये 

रवीचे कुटुंबिय मुळचे शेगाव पाथर्डी येथील रहिवासी आहेत. त्याचे आई-वडील रस्त्यावर दगड फोडण्याचे काम करतात. मंचर-नारायणगाव रस्त्याचे काम सुरू असल्याने संदीप भिल आणि त्यांचे कुटुंब मजुरी कामासाठी आले आहेत. रस्त्याचे काम सुरु असताना रवी मजूरांच्या सर्व मुलांसोबत खेळत असताना रस्त्याच्या कडेला खोदलेल्या बोरवेअलमध्ये पडला. सर्व मुलं दिसत होती मात्र रवी खेळताना दिसत नसल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी शोधाशोध केली असता रवी बोअरवेलमध्ये पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गावकऱ्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर मंचर पोलीस, जिल्हा प्रशासन, तहसीलदार, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -