Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संतापजनक घटना! पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

संतापजनक घटना! पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

Related Story

- Advertisement -

पुण्यातील वानवाडी सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची घटना समोर आली आहे. पुण्यातील ३९ वर्षाच्या रिक्षा चालकाने या ६ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. या नराधम रिक्षा चालकाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्याकडेला आईच्या शेजारी झोपलेल्या या चिमुकलीला रात्री नराधम रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईच्या शेजारी झोपलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला रात्री १ च्या सुमारास रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर तिला रिक्षात घालून मार्केट यार्ड परिसरात नेण्यात आले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान चिमुकलीच्या आईला जाग आली असता तिच्या शेजारी झोपलेली मुलगी गायब असल्याचे दिसली. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध सुरु केला. यावेळी सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड परिसरात दिसला. त्यानंतर पोलिसांनी मार्केट यार्ड गाठत आरोपीला शोधून त्याला अटक केली. सध्या या अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वानवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

- Advertisement -

वानवाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर १३ नराधमांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ६ जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आलीय. वानवाडी पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे एका रिक्षा चालकाने तिला राहण्याची व्यवस्था करतो असं सांगून तिला वानवडी येथे नेले. यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. सुरुवातील सहा रिक्षाचालक आणि दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनी या पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती.


लॅपटॉप अन् Ak-47 हाती घेत तालिबान रिझर्व्ह बँक गव्हर्नर सांभाळणार कारभार


 

- Advertisement -