घरCORONA UPDATEतिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता  - राजेश टोपे

तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता  – राजेश टोपे

Subscribe

टेस्टिंग वाढवल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (State Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत  तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of coroen) पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. टेस्टिंग वाढवल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.  कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक कोरोना बाधित झाले. तर दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक कोरोना बाधित होते. तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (60 lakh people likely to be affected in the third wave rajesh tope)   १२ टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज दुसऱ्या लाटेत समोर आली. दुसऱ्या लाटेत साडेसहा लाख अँक्टिव्ह रुग्ण होते. तिसऱ्या लाटेत १३ लाख अँक्टिव्ह रुग्ण असू शकतात असा अंदाज लावण्यात आला आहे. त्या अनुशंगाने तयारी करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस १ हजार अँम्बुलन्स वापरात येणार 

५ सप्टेंबरपर्यंत १२०० डॉक्टरांचे काउन्सिंग करुन त्यांची भरती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आधी राज्यात १२००-१३०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची ती आता २ हजार पर्यंत वाढवली आहे. जुलै महिन्यांच्या अधिवेशनात कोरोनाच्या तिसऱ्यालाटेच्या संदर्भात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, औषधे, आवश्यक साधने, बेड्स, अँम्बुलन्स खरेदी केल्या आहेत. १ हजार अँम्बुलन्समधील उरलेल्या ५०० सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्राथमिक आरोग्यापर्यंत उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ५ हजार कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ज्यात ग्रामीण रुग्णालय तसेच अपग्रेडशनच्या बांधकामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी कर्ज काढण्यास आले आहे. त्यासंबंधीचा पाठपुरवठा सुरू आहे,असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.

- Advertisement -

सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख अधिक लसींचे डोस मिळणार

राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे करण्यात येणारा सततचा पाठपुरवठा लक्षात घेऊन सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख कोरोना विरोधी लसींचे डोस देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  केंद्राकडून राज्याला सप्टेंबर महिन्यात ५० लाख अधिक लसींचे डोस मिळणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

केरळमध्ये सर्वात कमी बाधितांची नोंद 

सिरो सर्वेक्षणमध्ये प्रत्येक राज्याचा अभ्यास करण्यात येतो. कोणत्या राज्यात काय परिस्थिती होती याचा अभ्यास केला जातो. सिरो सर्वक्षणाच्या रिपोर्टनुसार, केरळ राज्यात सर्वात कमी बाधित झालेले राज्य आहे. केरळमध्ये ४२ टक्के लोक कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात ५५ टक्के बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मध्यप्रेदश राज्य सर्वात जास्त बाधित झालेले राज्य आहे. मध्यप्रदेशमध्ये ८९ टक्के लोक कोरोना बाधित झाले असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि केरळ राज्याचा परफॉर्ममन्स इतर राज्यांच्या तुलनेत चांगला आहे.

- Advertisement -

 

आश्रमातील बाधित मुलांवर योग्य उपचार केले जातील

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील मुलांची आकडेवारी ही ८-१० टक्के आहे आणि मृत्यूचे प्रमाणे फार नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.  मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा येथील ‘सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल’ या अनाथाश्रम शाळेतील १५ लहान मुलांना व ७ कर्मचाऱ्यांना असे एकूण २२ जणांना कोविडची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आश्रमातील बाधित मुलांवर योग्य उपचार केले जातील,असे देखील राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आशा वर्करच्या पगारात वाढ

राज्यातील ७१ हजार आशा वर्करच्या पगारात यावर्षी १५०० रुपये वाढ करुन देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर ३६०० गटप्रवर्तकांना १७०० रुपये वाढवून देण्यात येणार आहेत.  याचा साधारण: खर्च हा दोन ते अडीशे कोटी रुपये खर्च राज्य करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.


 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -