नागपुरात अग्निवीर भरतीसाठी विदर्भातून ६० हजार तरुण सहभागी होणार

येत्या १७ सप्टेंबरपासून नागपुरात अग्निवीर भरतीला सुरूवात होणार आहे. ७ ऑक्टोंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. विदर्भातील जवळपास ६० हजार तरुण सहभागी होणार आहेत. यासाठी नागपूर प्रशासनाचे संबंधित सर्व कार्यालयं सैन्य भरती मेळावा-२०२२ साठी सज्ज आहेत. जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार उमेदवारांची निवड रात्री १० वाजता मैदानावर सुरू होणार आहे.

अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर अशा दहा जिल्हयातील उमेदवार या मेळाव्यात सहभागी होतील. उमेदवारांना भरती मैदानावर ने-आण करण्यासाठी, नागपूर महापालिकेने सीटी बसेसची सुविधा self-paid तत्वावर उपलब्ध करुन दिली आहे. तसेच नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या भरती मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सैन्य भरती प्रक्रियेसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये सैन्यातर्फे येणाऱ्या 150 सेवारत कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेचा समावेश आहे.

दरम्यान, बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना नागपूरपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र परिवहनच्या तर्फे pay and use तत्वावर विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल