घरCORONA UPDATEराज्यात ६,१५९ नवे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

राज्यात ६,१५९ नवे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६ हजार ७४८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६० टक्के एवढा आहे.

राज्यात ६,१५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,९५,९५९ झाली आहे. राज्यात ८४,४६४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६ हजार ७४८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६० टक्के एवढा आहे.

राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १७, नवी मुंबई मनपा २, पनवेल मनपा ३, जळगाव २, पुणे ५, सोलापूर २, सातारा ११, बीड ४, नागपूर ८ व अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ६५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

- Advertisement -

आज ४,८४४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १६,६३,७२३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०४,५६,९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,९५,९५९ (१७.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२९,३४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -