घरताज्या घडामोडीSchool Reopen: मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक! महाराष्ट्रातील ६२ टक्के पालकांचे मत, सर्वेक्षणातून...

School Reopen: मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक! महाराष्ट्रातील ६२ टक्के पालकांचे मत, सर्वेक्षणातून समोर

Subscribe

सर्वेक्षणात असलेले पालक ओमिक्रॉनमुळे चिंतेत होते आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबतची आशा त्यांनी व्यक्त केली होती.

अजूनही देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे सावट कायम आहे. राज्यात ४० हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतहीी मोठी वाढ होत आहे. अशातच राज्य सरकारकडून उद्या, सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. पण सध्या राज्य सरकाराच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. कारण अजूनही कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली नसताना राज्य सरकारचे हे पाऊल धोकादायक वाटत आहे. महाराष्ट्रातील ६२ टक्के पालकांना मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक असल्याचे वाट आहे असून ११ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

दरम्यात राज्यात ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू केल्या होत्या. पण नंतर ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डिसेंबरमध्ये पहिली ते नववी आणि अकरावी ऑफलाईन शिक्षण बंद करून ऑनलाईन सुरू करण्यात आले. पण गुरुवारी २० जानेवारीला राज्य सरकारने २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

लोकल सर्कल एका सामुदायिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्व ३६ जिल्ह्यातील १,२,३ शहरांमधील ४ हजार ९७६ पालकांपर्यंत पोहोचले. यामध्ये ६२ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्याचे धोकादायक पाऊल उचलण्यास तयार नव्हते. अध्यक्ष आणि संस्थापक सचिन टापरिया म्हणाले की, ‘मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असावा असे मत पालकांचे आहे.’ मुलांना शाळेत पाठवण्यास आई-वडिलांची संमती ही अनिवार्य आहे.

या सर्वेक्षणात भाग घेणारे जवळपास ६७ टक्के लोकं पुरुष होते. १ शहरामध्ये ४४ टक्के पालकांनी उपस्थिती दाखवली. त्यानंतर २ शहरात ३१ टक्के, ३,४ आणि ग्रामीण क्षेत्रात २५ टक्के उपस्थिती पालकांनी दाखवली. दरम्यान १६ टक्के पालक पहिल्यापासून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. हे १०वी आणि १२वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक होते. तसेच ११ टक्के पालक उद्यापासून मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. एवढ्याचे संख्येने पालक शाळेत पाठवायचे की नाही? या संभ्रमात होते.

- Advertisement -

सर्वेक्षणात असलेले पालक ओमिक्रॉनमुळे चिंतेत होते आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबतची आशा त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान राज्य सरकारने स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यास सांगितला आहे. मुंबई आणि ठाण्यातील शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. तर पालघर जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तसेत पुण्यातील शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


हेही वाचा – Varsha Gaikwad : पहिली आणि दुसरीच्या शालेय अभ्यासक्रमात बदल होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -