घरक्राइमबनावट कागदपत्रांच्या आधारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा; ७ जण ताब्यात

बनावट कागदपत्रांच्या आधारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा; ७ जण ताब्यात

Subscribe

बनावट कागदपत्रांच्या आधारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अंबरनाथमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 43 लाख रुपयांचं सोनं आणि 9 मोबाईल हस्तगत केले.

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अंबरनाथमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 43 लाख रुपयांचं सोनं आणि 9 मोबाईल हस्तगत केले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (63 lakhs to IDBI Bank on the basis of forged documents 7 people in custody)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या दिशा पोटे नावाच्या एका महिलेला नवीन घर खरेदी करायचे होते. यासाठी त्यांनी कामोठेतील निळकंठ सोसायटीत राहणाऱ्या जयंत बंडोपाध्याय यांचे घर खरेदी करायचे ठरवले. घर खरेदी करण्यासाठी बंडोपाध्याय यांच्या ओळखीतला एजंट निलेश माने याने घर खरेदी साठी रसिका नाईक आणि रमाकांत नाईक यांच्याशी संगनमत करून दिशाला त्याच्या ऑफिस मध्ये घेऊन गेला.

यावेळी दिशाकडून १ लाखरुपये बयाना रक्कम घेऊन, उर्वरित रक्कम लोन काढून देणार असल्याचे दिशाला सांगितले. त्यानंतर रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांनी दिशा आणि बंडोपाध्याय यांची कागदपत्रं घेऊन अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशाच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज केला. तसेच नाईक त्रिकुटाने बंडोपाध्याय यांच्या नावाने नवी मुंबई इथल्या आयसीआयसीआय बँकेत एक बनावट खाते उघडले. दिशा पोटेच्या कागद पत्रांची पूर्तता झाल्यांनतर आयडीबीआय बँकेने मंजूर केलेले ६३ लाख रुपयांचे कर्ज बंडोपाध्याय यांच्या बनावट अकाउंटमध्ये जमा करण्यात आले.

- Advertisement -

६३ लाख रुपयांचे कर्ज बनावट खात्यात जमा झाल्यानंतर सिडकोच्या एनओसीसाठी बँकेने दिशा पोटेला संपर्क साधला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेने बंडोपाध्याय यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाही आणि त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी आयसीआयसीआय बँकेत जाऊन रेकॉर्ड तपासल्यानंतर, बंडोपाध्याय यांचे खाते बनावट असल्याची बाब समोर आली.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयडीबीआय बँकेने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या शब्बीर पटेलला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी ताब्यात घेतले.

यानंतर शब्बीरची चौकशी केल्यानंतर रसिका नाईक, मंदार नाईक आणि रमाकांत नाईक यांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. तसेच बनावट कागदपत्रे बनवून देणारे कुणाल जोगडीया आणि किशोर जैन या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. बंडोपाध्याय यांच्या नावाने बनावट खाते उघडणाऱ्या राजेंद्र शेट्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

दरम्यान, याप्रकरणी कर्जाची मागणी करणाऱ्या दिशा पोटे यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यांचा खरोखरच या गुन्ह्यात सहभाग आहे का? त्यांना फसवणुकीची माहिती होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी आरोपींनी बँकेला गंडवले असले तरी, कर्जाची मागणी करणाऱ्या दिशा पोटेचा सुद्धा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणी आम्ही सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी इतर बँकांची देखील फसवणूक केल्याचा संशय आहे. पुढील तपास सुरू आहे.
– अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पूर्व


हेही वाचा – मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईत भाजप सहभागी, सचिन सावंतांकडून पुन्हा ट्वीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -