घरमहाराष्ट्रZP and panchayat samiti Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत ६३टक्के...

ZP and panchayat samiti Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत ६३टक्के मतदान

Subscribe

पालघरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या सहा  जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१  रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी  मंगळवारी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर,  धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर या सहा जिल्हा परिषदा आणि  त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या  ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४  निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या.

- Advertisement -

त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी आज मतदान झाले. सर्व ठिकाणी आज, बुधवारी सकाळी  १० वाजता मतमोजणी सुरू होईल.

प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी :- 

धुळे-  ६०,  नंदुरबार- ६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. एकूण सरासरी- ६३ टक्के.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -