घरमहाराष्ट्रदिवाळीच्या उत्साहात सुरक्षेकडे दुर्लक्ष, मुंबईत फटाक्यांमुळे सहा दिवसांत आगीच्या 64 घटना

दिवाळीच्या उत्साहात सुरक्षेकडे दुर्लक्ष, मुंबईत फटाक्यांमुळे सहा दिवसांत आगीच्या 64 घटना

Subscribe

मुंबई : मुंबईसह राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसत होता. पण काही ठिकाणी या उत्साहात सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या सहा दिवसांत फटाक्यांमुळे 64 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु काही ठिकाणी वित्तीयहानी नोंदवली गेली आहे. यासंदर्भातील माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली आहे.

वास्तविक, मार्च 2020पासून मुंबईत कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे दोन वर्षे मुंबईकरांच्या सण, उत्सवांवर निर्बंध आले होते. मात्र आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. तसा दिवाळी सणही धुमधडाक्यात साजरा होत आहे. संपूर्ण मुंबईत दिवाळीला मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांच्या धुरामुळे काही ठिकाणी कमी – अधिक प्रमाणात वायूप्रदूषण झाले. तर दुसरीकडे गेल्या सहा दिवसांत फटाक्यांमुळे कमी-अधिक प्रमाणात आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वित्तीयहानी झाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

गिरगाव, नवाकाळ पथ, मूगभाटमधील उरणकरवाडी नाक्यावर बुधवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागून त्यामध्ये एक बंद गोदामासह काही भंगार सामान आणि 14 दुचाकी, चारचाकी वाहने जळून खाक झाल्याचे समजते. आगीपासून वाहने वाचविताना एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग फटाक्यांमुळे लागल्याचे सांगितले जाते. अग्निशमन दलाच्या जवानांनी, मध्यरात्री २.५५ वाजताच्या सुमारास अथक प्रयत्न करून सदर आगीवर नियंत्रण मिळविले

फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटनाॉ

  • शनिवारी (22 ऑक्टोबर) 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली.
  • रविवारी (23 ऑक्टोबर) 27 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 7 ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्या.
  • सोमवारी (24 ऑक्टोबर) 41 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 28 ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्या.
  • मंगळवारी (25 ऑक्टोबर) विविध ठिकाणी आगीच्या 36 घटना घडल्या असून त्यापैकी 12 ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना लागल्या.
  • बुधवारी व गुरुवारी (26 – 27 ऑक्टोबर) दोन दिवसांत आगीच्या 34 घटना घडल्या. त्यापैकी 15 ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -