राज्यात ६,४०६ नवे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,८१३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६ टक्के एवढा आहे.

Maharashtra Corona Update: 58 thousand 952 new corona patients registered in Maharashtra state
Maharashtra Corona Update: राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात ६,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,०२,३६५ झाली आहे. राज्यात ८५,९६३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,८१३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १५, नवी मुंबई २, नाशिक २, पुणे ६, पिंपरी चिंचवड मनपा ३, सातारा ६, कोल्हापूर ३, परभणी ३, नागपूर ६ आणि अन्य राज्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ६५ मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

आज ४,८१५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,६८,५३८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०५,४७,३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,०२,३६५ (१७.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,६९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.