घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात २४ तासांत ६,४९७ नव्या रूग्णांची नोंद; १९३ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात २४ तासांत ६,४९७ नव्या रूग्णांची नोंद; १९३ जणांचा मृत्यू

Subscribe

आतापर्यंत एकूण १ लाख ४४ हजार ५०७ रूग्णांनी कोरोनावर केली मात

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ६ हजार ४९७ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १९३ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६० हजार ९२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार १८२ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४४ हजार ५०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परितले आहेत.

आतापर्यंत एकूण १ लाख ४४ हजार ५०७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट हा ५५.३८ टक्के इतका झाला आहे. यासह राज्यात आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ४.०२% एवढा झाला असल्याचे सांग्ण्यात येत आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २लाख ६० हजार ९२४ (१९.४३ टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४१ हजार ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका ११५८ ९४१४६ ४७ ५३३५
ठाणे ३०९ ८६५६ १६४
ठाणेमनपा ३५३ १५११० २३ ५८२
नवीमुंबईमनपा २४८ ११०८५ २९५
कल्याणडोंबवलीमनपा ४९४ १५१०५ १८ २१७
उल्हासनगरमनपा २३४ ४६१५ ७५
भिवंडीनिजामपूरमनपा ४८ ३०२४ १७४
मीराभाईंदरमनपा २२३ ६१८३ १९८
पालघर ४५ १८९६ २२
१० वसईविरारमनपा २८९ ८१८२ १७२
११ रायगड २३० ४४५७ ६३
१२ पनवेलमनपा १७६ ४४०८ १०१
१३ नाशिक ८१ १७१७ ७२
१४ नाशिकमनपा १४८ ४३९९ १४३
१५ मालेगावमनपा १२०० ८५
१६ अहमदनगर २६ ५५० १९
१७ अहमदनगरमनपा २० ३४४
१८ धुळे ७८५ ४४
१९ धुळेमनपा ७३८ ३४
२० जळगाव १७९ ४६१८ २९१
२१ जळगावमनपा ४१ १४१२ ६२
२२ नंदूरबार २७९ ११
२३ पुणे १२४ ३७५३ १०७
२४ पुणेमनपा ५६४ २९६१२ २० ८९७
२५ पिंपरीचिंचवडमनपा ३६७ ६८१५ १२३
२६ सोलापूर ९८ ९०२ ३६
२७ सोलापूरमनपा २३७ ३४११ ३१५
२८ सातारा ७१ १७८० ६८
२९ कोल्हापूर ८६ ११२२ २०
३० कोल्हापूरमनपा ११ ९८
३१ सांगली २३ ५२१ १३
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १०१
३३ सिंधुदुर्ग २६२
३४ रत्नागिरी १४ ८८४ ३०
३५ औरंगाबाद १०५ १९७८ ३७
३६ औरंगाबादमनपा ११० ६४५४ ३०४
३७ जालना १०० १०८३ ४७
३८ हिंगोली ३४२
३९ परभणी ११७
४० परभणीमनपा ९७
४१ लातूर ३४ ४२७ २६
४२ लातूरमनपा २१ २९२
४३ उस्मानाबाद १४ ३९५ १७
४४ बीड १५ २३५
४५ नांदेड ३० २११
४६ नांदेडमनपा ३९५ १६
४७ अकोला ३७८ २३
४८ अकोलामनपा १४९८ ७१
४९ अमरावती १०८
५० अमरावतीमनपा ३१ ७५० २९
५१ यवतमाळ २४ ४४८ १४
५२ बुलढाणा १२ ४११ १६
५३ वाशिम २२ १९५
५४ नागपूर २९४
५५ नागपूरमनपा १७४० १९
५६ वर्धा ३४
५७ भंडारा १६२
५८ गोंदिया २१६
५९ चंद्रपूर १२ १३६
६० चंद्रपूरमनपा ४१
६१ गडचिरोली ११५
इतरराज्ये /देश २०२ ३१
एकूण ६४९७ २६०९२४ १९३ १०४८२

 


बायोकॉननं आणलं Covid 19 वर नवं औषध, जाणून घ्या, किंमत!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -