घरताज्या घडामोडीडेटिंग साईट शोधणे पडले महागात; ६५ लाखांचा झटका!

डेटिंग साईट शोधणे पडले महागात; ६५ लाखांचा झटका!

Subscribe

साथीदाराच्या शोधासाठी शोधलेल्या डेटिंग साईटने लावला ६५ लाखांचा चुना

पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग साईट शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. डेटिंगची सर्व्हिस न देता वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल ६५ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केली आहे. ही घटना मे आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान घडली आहे. जयंत विश्वनाथ ढाळे (वय ४०) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयंत हे इंटरनेटवर गुगलवर डेटिंगसाठी सर्च करत होते. त्यावेळी त्यांना एक मोबाइन नंबर मिळाला. त्यावर जयंत यांनी फोन केला. फोनवरील व्यक्तीने जयंत यांना प्रथम रजिस्ट्रेशन करायला सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असे जयंत यांना सांगण्यात आले. त्यानुसार रजिस्ट्रेशन करताना जयंत यांनी बँकेच्या खात्यावर काही रुपये भरले.

- Advertisement -

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना आरोपींनी सर्व्हिस दिली नाही. उलट वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे भरूनही सर्व्हिस मिळत नसल्याने जयंत यांनी त्यांचे प्रोफाइल बंद करण्यास सांगितले. त्यानंतरही प्रोफाइल क्लोजर, होल्डिंग चार्ज, अकाउंट व्हेरिफिकेशन, प्रोफाइल मॅचिंग, कमिशन अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. आरोपींनी एकूण ६५ लाख रुपयांच्या फसवणूक केली. पैसे देऊनही सर्व्हिस न देता तसेच प्रोफाइल बंद न करता आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच जयंत यांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने तपास करून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राईम चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -