घरपॉझिटिव्ह न्यूजदेव तारी त्याला कोण मारी, चोवीस तास ढिगाऱ्याखाली राहूनही ६५ वर्षीय आजी...

देव तारी त्याला कोण मारी, चोवीस तास ढिगाऱ्याखाली राहूनही ६५ वर्षीय आजी बचावल्या

Subscribe

मिरगाव मध्ये दरड कोसळल्यानंतर गावावर मोठे संकट कोसळले या दुर्घटने दरम्यान 65 वर्षीय सरसाबाई वाकाडेही जमिनीखाली गाडल्या गेल्या.

 

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. अशातच राज्यभरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्याने अनेकांची घरे वाहून गेली. तसेच प्रचंड आर्थिक नूकसाना सोबतच अनेक नागरिक मृत पावल्याच्या घटना समोर आल्या. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव येथे घडलेल्या दुर्घटनेदरम्यान काल एनडीआरएफ पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. बचाव पथकाचे काम दिवसरात्र सुरू असतानाच आणखी सहा लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर कालच्या दिवसभरातील पावसाने थोडीफार उसंत दिल्या नंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. आज सकाळी पावसाने काहीसा धीर दिला. एनडीआरएफची टीम काम करत असताना त्यांचाही जोर वाढू लागल्याने कामाला वेग आले. गुरूवारी मध्यरात्री मिरगाव मध्ये दरड कोसळल्यानंतर गावावर मोठे संकट कोसळले या दुर्घटने दरम्यान 65 वर्षीय सरसाबाई वाकाडेही जमिनीखाली गाडल्या गेल्या. बचाव पथके लोकांची मदत करण्यास धावत असल्याने गावकऱ्यांन मध्ये गोंधळ उडाला होता प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सरसाबाईचा थांगपत्ता न लागल्याने सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले. सरसाबाईच्या कुटूबीयांना त्यांची काळजी वाटू लागली.

- Advertisement -

मात्र एका दिवसानंतर बचावकार्याच्या पथकाला जमिनीखालून आवाज येत असल्याचने तपास केला असता सरसाबाई फक्त डोकं वर असलेल्या अवस्थेत जिवंत अढळून आल्या. त्यांना त्वरीत बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांच्या कुटूबीयांनी या संकट परिस्थितीतही आनंद व्यक्त करत देवाचे आभारा मानले.


हे हि वाचा – भारतातील 130 कोटी लोकसंख्ये पैकी फक्त 2 टक्के नागरिक भरतात प्राप्तीकर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -