मुंबईत आणखी एक ‘कोरोना’बळी, तर ६७ नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जरी कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत कमतरता आली असली तरी, कोरोनामुळे रुग्णांचा अधूनमधून मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत.

मुंबईत दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून तीन आकडी नोंदवली जात होती. मात्र गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या तीन आकडीवरून आता दोन आकडी म्हणजे ६७ वर आली आहे. ही बाब मुंबईसाठी आणि पालिका आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने काहीशी दिलासा देणारी ठरली आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ११ लाख ६२ हजार ९९० झाली आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण मृत रुग्णांची संख्या १९ हजार ७६६ झाली आहे. तसेच, गेल्या २४ तासांत १८४ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून मुंबईत आतापर्यंत ११ लाख ४२ हजार ५५६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ६६८ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत आठ महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळाली होती. शहरात २४ तासांत फक्त २४० रुग्ण आढळून येत होते. परंतु सात दिवसांच्या काळात हा रुग्णांचा आकडा १३०च्या वर पोहोचला. एप्रिल महिन्यात मुंबईमध्ये कोविड-१९ चे ५ हजार ५९४ रुग्ण आढळून आले होते. तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा : ३२९ कर्जधारकांचा ताण मिटला; लोकअदालत मधून लागला कोट्यावधीचा निकाल