Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात आठ महिन्यांत 685 शेतकऱ्यांची आत्महत्या; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

मराठवाड्यात आठ महिन्यांत 685 शेतकऱ्यांची आत्महत्या; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

Subscribe

औरंगाबाद : गेल्या 3-4 वर्षापासून मराठवाडा अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाने दाडी मारल्याने मराठावाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीने शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आहेत. यात राज्याचे कृषीमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलेले आहेत. याचा अर्थ दिवसाकाठी शेतकरी 2 ते 3 आत्महत्या करत आहेत.

मराठवाड्यात 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत जवळपासून 685 शेतकऱ्यांनी अनेक कारणांनी आपले जीवन संपविले आहे. गत वर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यात 1 हजार 22 शेतकरी आत्महत्येंची नोंद करण्यात आली होती. यानंतर यंदाच्या वर्षी आठ महिन्यात 685 ऐवढी आत्महत्येची संख्या वाढली आहे.

- Advertisement -

 एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

औरंगाबादमध्ये एकाच दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली  आहेत. याद दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आणि एका शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील दिनकर बिसनराव बिघडे (वय 48 वर्षे), वैजापूरमधील जरून येथील अरविंद साहेबराव मतसागर (वय 43 वर्षे) आणि फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोले (वय 55 वर्षे) या शेतकऱ्यांचे नाव आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस

तीन वर्षात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी

1 जानेवारी ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात 685 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
1जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 मध्ये मराठवाड्यात 1022 शेकऱ्यांच्या आत्महत्या
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021मध्ये मराठवाड्यात 887 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020मध्ये मराठवाड्यात 773 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

 

- Advertisment -