करोनाचे ५ बळी; करोनाग्रस्त उपचार घेऊन बरा झाला, तरीही मृत्यूने गाठलेच

corona
जयपूर येथे इटालियन पर्यटकाचा मृत्यू

जयपूरमध्ये आलेला एक ६९ वर्षीय परदेशी महिला पर्यटकाचा आज ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जयपूरमध्ये आलेला हा इटालियन पर्यटक करोना चाचणीत पॉझिटीव्ह आला होता. पण करोनावर उपचार घेऊन तो बरा झाला होता. पण आज जयपूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर बरा होऊन मृत्यूमुखी पडणारे हे देशातले पहिले प्रकरण आहे. जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर या विषाणूंचा परिणाम जास्त प्रमाणात होत असल्याचे या मृत्यूच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.