घरताज्या घडामोडीMTNL: ९ वर्षांमध्ये ७.५८ लाख मुंबईकरांचा MTNL लँडलाईन सेवेला रामराम

MTNL: ९ वर्षांमध्ये ७.५८ लाख मुंबईकरांचा MTNL लँडलाईन सेवेला रामराम

Subscribe

सध्याच्या युगात सगळ्यांचीच मोबाईलला सर्वाधिक पसंती आहे. अगदी सर्वसामान्यांच्या घरीसुद्धा टेलिफोन न वापरता मोबाईल वापरला जातो. त्यामुळे टेलिफोनचे कनेक्शन बहुतांश लोकांनी काढून टाकलं आहे. मुंबईत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई म्हणजेच एमटीएनएल लँडलाईनची सेवा आणि दर्जा सुमार घसरला घसरला आहे. तसेच कंत्राटीकरणामुळे ग्राहकाने पाठ फिरवली आहे. मागील ९ वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या ७.५८ लाख आहे. तर त्यात समाधान म्हणजे ३.२५ लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमटीएनएल मुंबईने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमटीएनएल मुंबईकडे मागील १० वर्षात लँडलाईन ग्राहकांची संख्या, सरेंडर संख्या आणि नवीन जोडणीची संख्या याची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांस एमटीएनएल मुंबईच्या उप महाव्यवस्थापक यांनी वर्ष २०१३-१४ पासून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. मागील ९ वर्षाची आकडेवारी लक्षात घेता सद्यस्थितीत १४,७५,५४७ ग्राहक आहेत. ही संख्या ९ वर्षांपूर्वी १९,४०,३३६ इतकी होती. मागील ९ वर्षात एकूण ७,५८,९२९ ग्राहकांनी सेवेस रामराम ठोकला असला तरी याच कालावधीत ३,२५,३२० इतके नवीन ग्राहक जोडले गेले. वर्ष २०२०-२०२१ या दरम्यान १,१६,२३३ ग्राहकांनी लँडलाईन सरेंडर केला आहे.

- Advertisement -

मागील २ वर्षांपासून नवीन ग्राहक जोडले गेले असले तरी वर्ष २०२०-२०२१ या दरम्यान फक्त ३९९८ तर वर्ष २०२१-२०२२ या दरम्यान २५३५ इतकी नगण्य संख्या आहे. मागील २ वर्षात १,८६,४७७ ग्राहकांने सेवा सरेंडर केली असून फक्त ६५३३ इतकी नवीन जोडणी करण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या मते आधीच सेवेबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि काही वर्षांत कंत्राटी कामामुळे सेवेचा दर्जा राखण्यात एमटीएनएल मुंबई सपशेल अपयशी ठरले आहे. नवीन भरती आणि सेवेची गुणवत्ता राखली तरच एमटीएनएल मुंबई स्पर्धेत तग धरु शकतो, अशी प्रतिक्रिया देत अनिल गलगली यांनी पंतप्रधान, टेलिकॉम मंत्री यांसकडे एमटीएनएल मुंबईला वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आम्ही धडपडत दहावी पास केली तेव्हा कोरोना कुठे होता, राज ठाकरेंचे वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -