घरमहाराष्ट्रओशो फाउंडेशन मॅनेजमेंटवर १००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप, तक्रार दाखल

ओशो फाउंडेशन मॅनेजमेंटवर १००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप, तक्रार दाखल

Subscribe

ओशोच्या ७ अनुयायांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत ओशो फाउंडेशनच्या ट्रस्टी आणि मॅनेजमेंटवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तसेच मनी लाँड्रिंग आणि परकीय चलनासंबंधीत नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोपही केले आहेत. ओशो फ्रेंड्स फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश ठक्कर यांनी पुण्यातील कोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये एक लिखित पत्र देऊन तक्रार दाखल केली आहे. परंतु यासंदर्भातील FIR अद्याप दाखल झालेला नाही.

योगेश ठक्कर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, परदेशातील ओशोंच्या अनुयायांकडून पुणे स्थित ओशो आश्रमातील कार्यासाठी डोनेशन घेतले जाते. परंतु चॅरिटी कमिश्नर या डोनेशनमधील सर्वाधिक पैशांचे व्यवहार फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटच्या कोणत्याही परवानगीशिवाय भारतबाहेर अवैध्यरित्या करत आहेत. पब्लिक ट्रस्ट प्रॉपर्टीच्या गैरव्यवहाराचे हे एक उत्तम असल्याचे आरोपही यात करण्यात आले आहेत. यासंदर्भातील बातमी आज तक हिंदीने दिली आहे.

- Advertisement -

जगभरात ओशोंचे कोट्यावधी अनुयायी आहेत. या अनुयायांकडून ओशो फाउंडेशनला मोठ्याप्रमाणात डोनेशन केले जाते. मात्र या तक्रारीत सांगण्यात आले की, या फाउंडेशनच्या व्य़वहारांसंदर्भात सखोल चौकशी केल्यास एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा उघडकीस येईल. ओशोंच्या ७ अनुयायांनी इकोनॉमिक ऑफेंस विंग (EOW)आणि पुणे पोलीसांच्या एसआयटीच्या माध्यमातून चौकशीचे आदेश दिले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -