मुंबईतील मतदारांमध्ये ७ लाखांनी वाढ; मतदार यादी प्रसिद्धी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Elections) निवडणूक विभागाने २३६ प्रभागनिहाय मतदार यादी (Voters List) प्रसिद्ध केली आहे. २०१७ ला मुंबईतील मतदारांची संख्या ९१,६४,१२५ एवढी होती. २०२२ मध्ये ९८,७७,०५० एवढी मतदार आहेत.

Maharashtra zilla parishad and panchayat samitie election postponed

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Elections) निवडणूक विभागाने २३६ प्रभागनिहाय मतदार यादी (Voters List) प्रसिद्ध केली आहे. २०१७ ला मुंबईतील मतदारांची संख्या ९१,६४,१२५ एवढी होती. २०२२ मध्ये ९८,७७,०५० एवढी मतदार आहेत. त्यामध्ये, पुरुष मतदारांची संख्या ५३ लाख ५४ हजार ९१६ एवढी आहे तर महिला मतदारांची संख्या ४५ लाख २१ हजार २५१ एवढी आणि अन्य मतदारांची संख्या ८८३ एवढी आहे. त्यानुसार, सदर मतदार यादीत २०१७ च्या तुलनेत ७,१२,९२५ ने नवीन मतदारांची वाढ झाली आहे. (7 lakh increase in Mumbai voters Voter list publicity)

मात्र सदर मतदार यादीत जर एखाद्याचे नाव नसेल, नाव किंवा पत्ता चुकीचे असेल तर येत्या १ जुलैपर्यंत पालिकेच्या स्थानिक प्रभाग कार्यालयात आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी केले आहे. येत्या ९ जुलैपर्यन्त मतदारांच्या हरकती व सूचना यांबाबत अंतिम निर्णय घेऊन सुधारित व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. मुंबईतील प्रभागांची संख्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी २२७ वरून २३६ एवढी सुधारित करण्यात आली. १ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. २८ फेब्रुवारी रोजी पालिकेने प्रभाग रचनेबाबतच्या हरकती व सूचना यांचे विविरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले.

५ मार्च रोजी सूचना व हरकती यांवर सुनावणी दिल्यावर राज्य निवडणूक आयोगाला विविरणपत्र सादर करण्यात आले. तसेच, ११ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली. १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. ३१ मे रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर, २३ जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता १ जुलै पर्यन्त त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आले आहेत. त्यानंतर ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हरकती व सुचनांत केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलला असेल तर योग्य प्रभागात नाव समाविष्ट करणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसेल, तर नाव अंतर्भूत करणे इत्यादी दुरुस्त्या करण्यात येतील.

या दुरुस्त्या करण्याबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील, करनिर्धारक व संकलक यांचे कार्यालयातील निवडणूक विभागात नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी केले आहे. दरम्यान, https://portal.mcgm.gov.in या मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


हेही वाचा – सदा सरवणकर यांचा फोटो असलेला बॅनर फाडला; मुंबईत शिवसैनिक आक्रमक