Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र राज्यात खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण; कृषीमंत्री दादा भुसेंनी दिली माहिती

राज्यात खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण; कृषीमंत्री दादा भुसेंनी दिली माहिती

Related Story

- Advertisement -

राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. तसेच राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली असून कोकण विभागात मुसळधार पाऊस होत आहे. औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. १२ जुलैपर्यंत राज्यात ३६८ मिमी. पाऊस झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

खोळंबलेली पेरणीची कामे सुरु

राज्यात ऊस पिकासह खरीपाचे क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापासून पर्जन्यमानास सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरु झाली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

विभागवार झालेली पेरणी

- Advertisement -

कोकण विभागात खरीपाचे ४.४२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ०.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात २१.१९ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी ११.२६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात ८.६७ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून आतापर्यंत ६.४१ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीपाचे क्षेत्र ८.३ लाख हेक्टर असून ६.७३ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात २०.२३ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी १७.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरीपाचे क्षेत्र २७.४९ लाख हेक्टर असून त्यापैकी २४.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ३२.२४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २६.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागात १९.२६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ११.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.


SEBC, ESBC उमेदवारांना मोठा दिलासा, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -