घरताज्या घडामोडीकरोना पॉझिटीव्ह ट्रॅव्हल ऑपरेटर १५ गाव फिरला, २३ जण पॉझिटीव्ह

करोना पॉझिटीव्ह ट्रॅव्हल ऑपरेटर १५ गाव फिरला, २३ जण पॉझिटीव्ह

Subscribe

पंजाबमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आता जवळपास १५ गावांमध्ये अक्षरशः खळबळ माजली आहे. यासाठी कारणही तसेच आहे. जवळपास १०० जणांना संपर्कात आलेल्या या व्यक्तीकडून २३ जण करोना पॉझिटीव्ह झाले आहेत. पंजाबच्या एका गुरूद्वारात पुजारी असणाऱ्या या व्यक्तीच्या संपर्कात येऊन आता १५ गावांमध्ये प्रवेशबंदी करण्याची वेळ आली आहे. पंजाबमध्ये एका ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती पंजाबमधील गुरूद्वारेत पुजारी म्हणून सेवा करते.

चंदीगढ येथे मृत्यू झालेला हा ७० वर्षीय नागरिक काही दिवसांपूर्वी दोन आठवड्याचा जर्मनी आणि इटलीचा दौरा उरकून भारतात परतला होता. आपल्या गावानजीकच्या आणखी दोन जणांसोबत या व्यक्तीने दौरा केला होता. पंजाबमध्ये करोना पॉझिटीव्ह असलेल्या ३३ प्रकरणांपैकी २३ जण हे या एकाच व्यक्तीकडून करोना पॉझिटीव्ह झाले आहेत. ही व्यक्ती भारतात आल्यानंतर दिल्लीहून पंजाबला स्वतःच्या कारने आली. त्यामुळे आता पंजाबमधील अधिकारी या प्रवासातील सगळ्या लोकांचे ट्रॅकिंग करत आहे. या व्यक्तीने शहीद भगत सिंह नगर जिल्ह्यातील आनंदपूर साहीबचा मोठा कार्यक्रमालाही हजेरी लावल्याचा अंदाज आहे. स्वतः करोना पॉझिटीव्ह होण्याआधी त्याने जवळपास १०० जणांच्या संपर्कात आल्याचा अंदाज आहे. ही व्यक्ती स्वतः एक ट्रॅव्हल कंपनी चालवते. त्याच्यासोबतच्या दोन व्यक्तींसह त्याने १५ गावांमध्ये दौरा केल्याचा अंदाज आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबातच १४ जण करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या घरातील लोकही इतरांना भेटल्याचा अंदाज आहे. त्या व्यक्तीच्या नातवंडांपासून अनेक कुटुंबीय अनेकांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -