देशात तब्बल सात हजार नवे कोरोनाबाधित, रुग्णसंख्येत ४० टक्क्यांची वाढ

गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय

corona

देशात कोरोनाचा (Corona virus) धोका पुन्हा एकदा वाढला असून गेल्या २४ तासांत ७२४० नव्या बाधितांची (new corona patients) नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या ३२ हजार ४९० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाल्याने चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. (7,000 new coronaviruses in the country, an increase of 40% in the number of patients)

देशात गेल्या २४ तासांत ७ हजार २४० नवे बाधित सापडले आहेत. तर, एका दिवासाचा पॉझिटिव्हिटी रेट (Positive Rate) १.६२ टक्के नोंदवण्यात आला असून आठवड्याचा ०.९१ टक्के नोंदवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, मृत्यूदर घटला पण पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्क्यांवर

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे देशभरात ८ रुग्णांचा मृत्यू (corona death) झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख २४ हजार ७२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ५९१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ९८.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाचा विळखा सैल झाला होता. त्यामुळे देशातील निर्बंध हळूहळू उठवण्यात आले. जनजीवन पूर्वपदावर आले. व्यवहार सुरूळीत होऊ लागले. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्येही सूट मिळाली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागल्याने नियम अधिक कडक केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका वाढला, मास्कबाबत टोपेंनी केले महत्त्वाचे विधान

देशभरात आज सापडलेल्या नव्या बाधितांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २ हजार ७९१ नवे रुग्ण सापडेल. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वांत मोठी वाढ आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडत आहेत. मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी शहरात १ हजार ७६५ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ८३ रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करम्यात आले. तर महाराष्ट्रात बुधवारी एकाही मृत्यू नोंद झालेली नाही.

हेही वाचा -कोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू, मर्सपासून ते Norovirus पर्यंत; जगभरात ‘या’ 8 व्हायरसचा कहर

मुंबईत नियमित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रीय रुग्णांचीही संख्या वाढत आहे. 

मुंबई – ७०००
ठाणे – १४८२
पालघर – १८१
रायगड – २५३
रत्नागिरी – १७
सिंधुदुर्ग – १०
पुणे – ६५०
सातारा -६
सांगली – ७
कोल्हापूर – १