राज्यात मंगळवारी ७६६ नवे रुग्ण, १९ जणांचा मृत्यू

१९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद...

corona
corona

मुंबई – राज्यात मंगळवारी ७६६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६,३१,२९७ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९,४९३ इतकी झाली आहे. राज्यात मंगळवारी १९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,४०,७६६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

राज्यात मंगळवारी ९२९ रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६४,७७,३७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४८,४४,८९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३१,२९७ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ८५,३३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.